July 24, 2024 8:33 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या निधी वाटपात भेदभाव केल्याचे आरोप फेटाळले

केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामण यांनी राज्यसभेत शून्य प्रहरातल्या चर्चेवेळी सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं. नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही असं नाही, असं सीतारामण यांनी स्पष्ट केलं. लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पादरम्यान महाराष्ट्र ...