September 19, 2024 11:40 AM

युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.   पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत राज्यातल्या मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

July 27, 2024 8:12 PM

युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सात नवीन स्थळांचा समावेश

युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आज सात नवीन स्थळांचा समावेश केला आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं भरलेल्या ४६ व्या जागतिक वारसा समितीच्या सत्रात हा समावेश करण्यात आला. यामध्ये जपानचं सदो बेट सोन्याच्या खाणी, चीनचं बीजिंग सेंट्रल ॲक्सिस, थायलंडचे फु फ्राबट ऐतिहासिक पार्क, रशियाचं केनोझेरो लेक लँडस्केप, केनियाचं ऐतिहासिक शहर आणि गेडीचे पुरातत्व स्थळ, दक्षिण आफ्रिकेतली नेल्सन मंडेला मानवी हक्कांसाठी लेगसी साइट्स, लिबरेशन अँड नॅशनल पार्क्स, लिबरेशन आणि रिकॉन्सिया पार्क  लेणी संकुल,  समित...