August 6, 2024 7:53 PM

भारतीय दूतावासाकडून युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

युनायटेड किंगडमच्या काही भागांत झालेली हिंसक आंदोलनं आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, लंडनमधल्या भारतीय दूतावासानं युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युकेच्या साऊथ पोर्ट भागात हिंसाचारामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हल्लेखोरांबद्द्दल चुकीची माहिती प्रसारित झाल्यामुळे काही ठिकाणी स्थलांतर विरोधी हिंसक निदर्शनं झाली. या पार्श्वभूमीवर युकेला भेट देणाऱ्या भारतीय प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी असं भारतीय दूतावासानं  म्हटलं आहे. 

July 5, 2024 8:36 PM

प्रधानमंत्री ऋषी सुनक यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीत झालेल्या पराजयाची जबाबदारी घेत सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.   प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनक यांनी मनोगत व्यक्त केलं.हुजूर पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याबद्दल सुनक यांनी समर्थकांची माफी मागितली.तसंच २०१० च्या तुलनेत गेल्या १४ वर्षांत ब्रिटन समृद्ध, निःपक्ष आ...