August 19, 2024 10:10 AM

संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यात काल रत्नागिरीमध्ये सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून, त्यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असं सामंत यांनी ...

August 13, 2024 4:11 PM

खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा – मंत्री उदय सामंत

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी रचलेल्या खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा, असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक नाशिक इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते.

August 13, 2024 8:53 AM

छत्रपती संभाजीनगर इथं होणारी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल – उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक ५२ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या उद्योजकांचा काल मसिआ या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातल्या उद्योजकांनी यावेळी राज्य सरकारला मानपत्र दिलं. हे मानपत्र म्हणजे विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर असल्याचं सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं. या उद्योगांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्...

August 12, 2024 4:38 PM

शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार पुन्हा उभा करू – उदय सामंत

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नुकत्याच आगीच्या तडाख्यात सापडून मोठं नुकसान झालेल्या कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली.  या  नाट्यगृहाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी निर्माण केलेला  तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही  नुकतीच भेट देऊन या नाट्यगृहाच्या नुकसानीची  पाहणी केली आहे. हे नाट्यगृह  जसं होतं तसं पुन्हा उभारण्यासाठी त्यांनी वीस कोटी रुपये अनुदान देण्याची  घोषणाही  त्यांनी यावेळी केली...

August 1, 2024 8:42 AM

डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा सरकारचा निर्णय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात, शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड झाली असून, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे.

July 25, 2024 7:43 PM

‘रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी’

रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी ते बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी आज रत्नागिरीत विविध आढावा बैठका घेतल्या.

July 20, 2024 11:17 AM

राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी – पालकमंत्री उदय सामंत

राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पाली इथं तीन कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्यानं उभारलेल्या एसटी बसस्थानकाचं लोकार्पण काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.   'गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यामधल्या बसस्थानकांच्या सुशोभिकरणासाठी १० कोटी रुपये दिले असून, रत्नागिरी, जाकादेवी, पावस, लांजा, गणपतीप...