August 28, 2024 1:14 PM

फसवे संदेश आणि कॉल्सचा सामना करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी एकत्रित काम करण्याची गरज – TRAI

अवांछित संदेश आणि फसव्या कॉल्सच्या समस्येचा सामना करण्यासाठी सर्व दूरसंचार कंपन्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असं TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी म्हटलं आहे. फसवे संदेश आणि दिशाभूल करणाऱ्या फोन कॉल्स पासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी TRAI नं नियमकांच्या संयुक्त समितीची काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.  URLs, APKs, OTT लिंक्स आणि SMS मध्ये ‘कॉल बॅक’ नंबरच्या व्हाइटलिस्टिंग अंमलबजावणी सक्षम करण्याचं आवाहन ...

August 14, 2024 1:22 PM

‘TRAI’चे नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश

ट्राय अर्थात दूरसंचार नियंत्रण मंडळाने नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. अनावश्यक फोन टाळण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं हे निर्बंध लावले आहेत. नोंदणीकृत क्रमांकाशिवाय कोणत्याही क्रमांकावरून असे फोन येत असल्याचं आढळल्यास फोन करणाऱ्या कंपनीला दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलं जाणार असून या काळात त्यांना इतर कोणत्याही मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडूनही नंबर मिळवता येणार नाही.

August 13, 2024 6:18 PM

नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवण्याचा ट्रायच्या सूचना

नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवावेत अशी सूचना  ट्राय अर्थात दूरसंचार नियामक आयोगाने सर्व इंटरनेट सेवा पूरवठादार कंपन्यांना केली आहे.  दूरसंचार सेवेचा वाणिज्य उपयोजन कॉलसाठी बेकायदा वापर होत असल्यास असे वापरकर्ते इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून काळ्या यादीत टाकले जावे अशी सूचना  प्रसारण मंत्रालयाने केली आहे.  सर्व इंटरनेट सेवापुरवठादारांनी नियमपालन करावं आणि दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला त्याचा अहवाल द्यावा असंही ट्रायने म्हटलं ...