August 15, 2024 8:06 PM

पेतोंगटार्न शिनावात्रा यांना थायलंडच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवारी

थायलंडच्या पॉप्युलर फेउ थाई पार्टीने आज पेतोंगटार्न शिनावात्रा यांची देशाच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली. उद्या प्रधानमंत्री पदासाठी होणाऱ्या संसदेच्या मतदानानंतर शिनावात्रा यांची निवड झाली तर त्या थायलंडच्या दुसऱ्या महिला प्रधानमंत्री बनतील. माजी प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना काल थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं पदच्युत केलं होतं. १६ वर्ष कैदेत असलेल्या माजी वकीलाची मंत्रीमंडळात नियुक्ती करुन नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे..

July 20, 2024 8:27 PM

महिलांच्या आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा मलेशियावर २२ धावांनी विजय

श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडने मलेशियावर २२ धावांनी विजय मिळवला. रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात थायलंडने मलेशियासमोर १३४ धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र मलेशियाला ८ गडी गमावून १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. याच मैदानावर श्रीलंका आणि बांगला देश यांच्यातला सामना सुरू झाला आहे. बांगला देशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा बांगलादेशच्या १५ व्या षटकात ६ बाद ६५ धाव...