September 9, 2024 2:52 PM

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. नौशेराच्या लाम परिसरात काही संशयास्पद हालचाली नजरेस आल्यावर भारतीय लष्करानं काल रात्री ऑपरेशन कांची ही शोधमोहीम सुरु केली. संबंधित परिसरात पूर्णपणे उजेड करुन देखरेख वाढवली. या मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरात लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. शोधमोहीम अद्याप सुरु असून त्यात मोठा शस्त्रसाठा मिळाल्याचं सेनादल सूत्रां...

July 16, 2024 3:01 PM

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाच सुरक्षादल जवानांचा आज मृत्यू झाला. यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य दलाच्या पथकांनी शोधमोहीम राबवली.   या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक होऊन पाच जवान जखमी झाले होते. त्या पाचही जणांना आज वीरमरण आलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कर्त...

June 13, 2024 8:41 PM

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी

जम्मू काश्मीर मधल्या दोडा जिल्ह्यातल्या गंडोहच्या कोटा टॉप भागात  सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. काल रात्री झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.