June 21, 2024 12:17 PM

लखबीर सिंग संधू दहशतवाद्याशी संबंधित प्रमुख दहशतवाद्याला अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पंजाबमधील फिरोजपूर येथून लखबीर सिंग संधू या दहशतवाद्याशी संबंधित असलेल्या, जसप्रीत सिंग या आणखी एका प्रमुख दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्र तसंच अंमली पदार्थ आणि दोन लाखांहून अधिक किमतीची रोकड आणि विविध संशयास्पद डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

June 17, 2024 8:29 PM

उत्तर काश्मिर : सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मिरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाचं पथक गेलं असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या पथकानं चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

June 17, 2024 2:25 PM

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला.   जम्मू-काश्मीरमधला दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. दहशतवाद आता नियंत्रणात असून संघटित हिंसक दहशती कृत्यांऐवजी छुप्या संघर्षाचं रूप त्याला प...