July 30, 2024 11:24 AM
भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा आज तिसरा क्रिकेट सामना
भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी श्रीलंकेतल्या पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघानं आधीचे दोन सामने जिंकून आघाडी घेतली असल्यानं भारतानं या मालिकेचं विजेतेपद याआधीच निश्चित केलं आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.