July 26, 2024 3:21 PM

टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत आणि बांग्लादेशमध्ये लढत

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांग्लादेशसोबत होत आहे. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या १२ षटकांत ५ बाद ३७ धावा झाल्या होत्या.

July 21, 2024 7:17 PM

महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय

  महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६६, तर रिचा घोषनं २९ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. फाली वर्मानं ३७ धावांचं योगदान दिलं.   भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करतान संयुक्त अरब अमिरातीला निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १२३ धावाच करता आल्या. कवीशा एगोडेगनं सर्वाधिक नाबाद ४० धावा केल्या. कर्णधार ईशा रोहित ओझानं ३८ धावा केल्या.   भारतात...

July 20, 2024 9:14 AM

टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.