September 20, 2024 7:47 PM
अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे आयाेजन
देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. माळीवाडा इथल्या विशाल गणेश मंदिर परिसर ते आंबेडकर चौक परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. नांदेड जिल्ह्यात स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिकेच्या वतीने आज नांदेड रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली गेली. या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक आणि स्वच्छता प्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला.