August 23, 2024 10:12 AM
सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे
दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी तसंच निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं संप मागे घेतला असल्याची घोषणा केली आहे. यात, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजसह दिल्लीतील केंद्रसरकारच्या रुग्णालयांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटेनेनं संप मागे घेत असल्याचं सांगितलं आहे. कोलकातामधील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात घडलेल्या घटनेची गंभीर दखल तसंच...