September 6, 2024 6:50 PM

चंद्रपुरातलं सागवान प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवणार

चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे.या लाकडापासून  प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर डेपोमधून सुमारे ३ हजार घनफूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे. यापूर्वीही संसद भवन, भारत मंडपम, राम मंदिरासाठी जिल्ह्यातलं सागवान पाठवलं आहे.

July 5, 2024 7:38 PM

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असून दोन महिन्यात समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. हा विषय चेतन तुपे, सरोज अहिरे, रोहित पवार आदींनी तारांकित प्रश्नाच्या आधारे उपस्थित केला.