September 5, 2024 7:54 PM

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१ % पाऊस, १०२ % क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला आहे. तसंच राज्यात १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात २०१८ नंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असल्याची माहिती आज मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख लाभार्थ्यांना ४ हजार ७८७ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. या योजनेमुळं अन्य योजना बंद होणार नाहीत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबिया...