September 13, 2024 8:52 AM

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं, महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

September 6, 2024 9:12 AM

एसटीच्या सर्व बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन

दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

September 5, 2024 6:57 PM

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षण

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षित आसन यापुढं कायमस्वरूपी दिलं आहे. ते कोणत्याही थांब्यावरून बसमधे आले तर त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे.

September 5, 2024 9:27 AM

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, संप मागे

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, या निर्णयानंतर, एसटी कर्मचारी कृती संघटनेने आपला संप मागे घेतल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे....

September 3, 2024 7:04 PM

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संप

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा सुविधा मिळाव्यात, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसंच इतर सुविधाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं राज्य सरकारला निवेदन देऊन सुद्धा त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही, राज्य सरकार विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा करत असतांना आमच्या मागण्या आणि वेतन वाढीकडेही सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आहे, या संदर्भात ए...

July 25, 2024 7:48 PM

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजनेला चांगला प्रतिसाद

‘‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्यात ४ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पास मिळाले आहेत. १८ जूनला ही योजना सुरु झाली. त्यानंतर केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले. ही संख्या गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत सुमारे ८३ हजारांनी जास्त आहे. तसंच उत्पन्नही २६ कोटी रुपयांनी वाढलं आहे. जुलै महिन्यातही अशाच पद्धतीनं एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरित करत असल्याचं एसटी महामंड...

July 4, 2024 3:28 PM

प्रत्येक एसटी आगारात ‘प्रवासी राजा दिन’चं आयोजन

प्रवाशांच्या समस्या तसंच तक्रारी वजा सूचना यांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण व्हावं म्हणून एस टीच्या प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेतील. आणि त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील.

June 17, 2024 3:28 PM

एसटी महामंडळ ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबवणार

एसटी महामंडळाकडून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहीम १८ जूनपासून राबवली जाणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एसटी बसचे पास आता थेट शाळेत मिळणार आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक माधव कुसेकर यांनी यासंदर्भात स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसंच शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवायला सांगण्यात आलं आहे.