September 8, 2024 1:48 PM

आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारताकडून मदत

झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारतानं अन्नधान्य पाठवलं आहे. झिम्बाब्वेला एक हज़ार मेट्रिक टन तांदूळ, झांबियाला तेराशे मेट्रिक टन मका पाठवला आहे. अल-नीनो मुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या मलावीला एक हज़ार मेट्रिक टन तांदळाची मदत मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.

July 10, 2024 10:57 AM

टी-२० महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १० गडी राखत विजय

भारत आणि दक्षिण अफ्रिके दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या 20 षटकांच्या महिला क्रिकेट सामन्यात तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघानं 10 गडी राखून पाहुण्या संघावर दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 85 धावांचं लक्ष्य भारतीय खेळाडूंनी केवळ 10 षटकं आणि 6 चेंडूत पार केलं. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालचा सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखली. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारला तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर संपूर्ण मालि...

July 8, 2024 10:58 AM

महिला क्रिकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी, फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 177 धावा केल्या होत्या. तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक 52 धावा 39 चेंडूत केल्या, तर एनेक बॉशने 32 चेंडूत 40 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 2, तर श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.   मात्र, खेळाच्या विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस झा...

June 29, 2024 7:41 PM

भारत ठरला महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ३६७ धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज सकाळच्या पहिल्या सत्रातच भारतानं आपला पहिला डाव कालच्या ४ बाद ५२५ धावांवरून पुढे सुरु केल्यानंतर विक्रमी ६ बाद ६०३ धावांवर घोषित केला. ही महिला कसोटी क्रिकेटमधील आजवरची सर्वोच्च सांघिक धावसंख्या असून, भारत महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरल...

June 19, 2024 7:47 PM

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत लढत

महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरु इथं सुरू आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बळींच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ षटकात तीन बळींच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या होत्या.  

June 17, 2024 10:01 AM

महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे बंगळुरु इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकात आठ बाद २६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८ व्या षटकातच १२२ धावात सर्वबाद झाला.