September 21, 2024 11:43 AM

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे -अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते झालं. कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांनी आपल्या सुरक्षिततेविषयी काळजी घ्यावी. अन्याय सहन न करता त्याविरुद्ध लढण्यास शिकावं आणि यासंदर्भातल्या कायद्यांविषयी साक्षर बनावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  

September 15, 2024 6:21 PM

सोलापूरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी करत सोलापूर शहरात बेमुदत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी माजी मंत्री प्रकाश शेंडगे हे देखील त्यांच्यासोबत होते. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी असून या प्रश्नासंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली आहे, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत न...

September 1, 2024 7:30 PM

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्याच्या हेतूनं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस काका आणि पोलीस दीदी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काल यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या उपक्रमाठी नियुक्त असलेले ८ पोलीस अधिकारी आणि २३ अंमलदार या बैठकीला उपस्थित होते. शिक्षक आणि शाळेतले इतर कर्मचारी, शिपाई यांची माहिती ठेवणं, शाळेतल्या मुलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहेत याबाबत जाणून घेण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

August 21, 2024 7:12 PM

उजनी पर्यटन आराखड्यासाठी २८० कोटी रुपयांच्या कामांना उच्च अधिकार समितीची मान्यता

सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण परिसरात करण्यात येणाऱ्या उजनी पर्यटन आराखड्यासाठी आवश्यक २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने आज मान्यता दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उजनी धरण पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून इथं अक्वॉटिक टुरिझम आणि वॉटर स्पोर्ट टुरिझम विकसित होऊ शकतं. या ठिकाणी जलतरण तलावाचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पा अंतर्गत धऱण परिसरात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, सभागृह, बोर्ड रुम, रॉक पूल, ल...

August 11, 2024 8:00 PM

लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६ लाख १५ हजार १३६ अर्ज प्राप्त

राज्यशासनाच्यावतीनं सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून  आतापर्यंत विविध ठिकाणाहून जवळपास ६ लाख १५ हजार १३६ अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५ लाख ४२ हजार ८१९ अर्ज जिल्हास्तरीय समितीनं पात्र ठरवले असून पुढील कार्यवाहीसाठी हे पात्र अर्ज शासनाला सादर करण्यात करण्यात आले आहेत. तर अपात्र ठरलेल्या जवळपास ५९ हजार ८९९ अर्जाची पुन्हा फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीनं  देण्यात आली आहे.

August 4, 2024 7:19 PM

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यासाठीचा १०० कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. श्रीक्षेत्र अरण तालुका माढा इथल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा आणि भक्तनिवास वास्तु...

July 7, 2024 2:59 PM

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळणार – उद्योगमंत्री चंद्रकांत पाटील

ऐतिहासिक वारसा असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखण्याचं, आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पाटील यांनी काल सोलापूरच्या जिल्हा नियोजन मंडळासोबत बैठक घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.

July 3, 2024 9:21 AM

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावे, यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

June 19, 2024 7:00 PM

सोलापुरच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता दिली. त्यानुसार जल, कृषी, धार्मिक आणि वाइन उद्योगाला चालना दिली जाणार आहे. तसंच या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठा प्रेक्षागृह उभारलं जाणार आहे.