July 30, 2024 9:49 AM

पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीच्या मिश्रप्रकारात भारताची जोडी आज कास्य पदकासाठी लढणार

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये काल नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या मानू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्या जोडीने उत्तम कामगिरी केली असून ते कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे.   हॉकी मध्ये काल पूल बी सामन्यात भारताचा सामना अर्जें‍टीना संघाशी होऊन तो बरोबरीत सुटला. आज भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना आयर्लंड शी होणार आहे.   बॅडमिंटन मध्ये भारतीय मानकीत खेळाडू लक्ष्य ...