September 24, 2024 1:32 PM

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत शेतकऱी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. आपण जवळपास ५० शेतकरी नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मुद्दे जाणून घेतल्याचं चौहान यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी  तिचा आत्मा आहेत, असंही ते म्हणाले. शेतकरी नेत्यांनी पिकांचे दर आणि पिक विमा याबद्दल अनेक सूचना केल्याचंही चौहान यांनी  सांगितलं.

September 6, 2024 10:24 AM

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता चौहान कालपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विजयवाडा, प्रकाशम धरण तसंच कृष्णा नदी लगतच्या पूरग्रस्त शेतांची हवाई पाहणी केली. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुर...

August 29, 2024 7:56 PM

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत रोपं लावली

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत ‘एक पेड मॉ के नाम’ या अभियानाअंतर्गत रोपं लावली. या वेळी त्यांनी सुमारे एक एकर जागेवर मातृवन स्थापन करण्याची योजना असल्याचंही सांगितलं.

July 19, 2024 8:46 PM

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं – मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्दटलं आहे. लखनौ इथं नैसर्गिक शेतीच्या विज्ञानावरच्या प्रादेशिक सल्लामसलत कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.   केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी अखिल भारतीय स्तरावरील जनजागृती मोहीम सुरू करणार आहे, सुरुवातीची दोन वर्षे उत्पादन कमी असेल त्यामुळे सरकार नैसर्गिक शेतीसाठी पहिली तीन वर्षे अनुदान देणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्याचे आवाहन त्...

July 12, 2024 12:48 PM

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. तुरीसारख्या कडधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याला प्राधान्य असेल, असं ते म्हणाले. उडीद, तूर आणि मसूर या सर्व कडधान्यांच्या १०० टक्के खरेदीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असेल असंही ते यावेळी म्हणाले.