September 19, 2024 7:26 PM

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी पातळीला स्पर्श

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आज देशातल्या शेअर बाजारातल्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्सनं आज सकाळच्या सत्रात ८३ हजार ७७४ आणि निफ्टीनं २५ हजार ६१२ या पातळीला स्पर्श केला. पण त्यानंतर दोन्ही शेअर बाजारात घसरण सुरू झाली. दिवसअखेर सेन्सेक्स २३७ अंकांची वाढ नोंदवून ८३ हजार १८५ अंकांवर बंद झाला. निफ्टीनं ३८ अंकांची वाढ नोंदवली आणि हा निर्देशांक २५ हजार ४१६ अंकांवर स्थिरावला. फेडरल रिझर्व्हनं काल ४ वर्षानंतर पहिल्यांच व्याजदरात कपात के...

August 9, 2024 7:28 PM

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८२० अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होतांना ८२० अंकांनी वधारून ७९ हजार ७०६ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २५० अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३६७ अंकांवर पोहोचला.

August 6, 2024 7:15 PM

शेअर बाजारात घसरण सुरुच

जपानच्या निक्केई या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम काल भारतीय शेअर बाजारावर झाला होता. आजही संपूर्ण दिवसभरात शेअर बाजारात घसरण सुरू राहिली.  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज १६६ अंकांची घसरण झाली आणि तो ७८ हजार ५९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६३ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९९३ अंकांवर बंद झाला.

August 2, 2024 2:26 PM

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज ५० अंकांनी घसरत २४ हजार ७४०वर आला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ रुपये ७३ पैशांवर आला आहे.

July 31, 2024 10:20 AM

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या हस्ते सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण

  भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजेच, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी काल भारतीय भांडवली बाजारात महत्वपूर्ण असलेल्या सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण केलं. याबरोबरच, राष्ट्रीय रोखे बाजारातल्या असक्रिय निधीशी संबंधित असलेलं देशातलं पहिलं संकेतस्थळ त्यांनी कार्यान्वित केलं.   असक्रिय निधी संबंधित माहिती पारदर्शक आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ करणं हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. सशक्त बाजार तंत्र विकसित करण्याच्या मुद्द्यावर जोर देताना गुंतवणूकदारांना सुलभता आणि सुरक्षा प्रदान करणं हा उ...

July 19, 2024 2:50 PM

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला आणि ८१ हजार १७७ अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं देखील सुरुवातीच्या सत्रात २४ हजार ८५५ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला, मात्र त्यानंतर तो ७३ अंकांनी कमकुवत होत २४ हजार ७२८ अंकांवर घसरला.

July 18, 2024 10:35 AM

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून, 779 मोबाइल सिमकार्डसह 23 मोबाइल हस्तगत पोलिसांनी हस्तगत केले.     ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करू...

July 16, 2024 2:52 PM

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्समध्ये आज विक्रमी वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात विक्रमी वाढ झाली. सुरवातीला २३० अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ९०० अंकांवर पोचला आणि तिसऱ्या सत्रात निर्देशांक ८० हजार ७३२ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात वाढ बघायला मिळाली. निफ्टीतही सुरवातीला ७४ अंकांची वाढ झाली आणि तो २४ हजार ६१६ वर पोचला.  

July 5, 2024 1:29 PM

शेअर बाजारातल्या तेजीला लगाम, सेन्सेक्समधे ५१० अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजारात गेले काही दिवस आलेल्या तेजीला आज लगाम बसला. कामकाजाला सकाळी सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये ५१० अंकांची घट होऊन तो ८० हजारांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८९ अंकांची घट नोंदवण्यात आली.

June 28, 2024 2:50 PM

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली.   मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०८ अंकांची वाढ नोंदवत ७९ हजार ५५१ अंकांची नवी उंची गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार १३१ अंकांच्या पार गेला.