August 9, 2024 1:23 PM

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांच्या संख्येत पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ४ कोटीवर पोहोचली होती. हा आकडा गाठण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागला होता. मात्र, त्यानंतर सुमारे  ६ ते ७ महिन्यात पुढचे १ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार जोडले गेले होते.   तर, केवळ ५ महिन्यात गुंतवणूकदाराची संख्या ९ कोटीवरून १० कोटीवर पोहोचल्याचं, एन एस ई नं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. डिजिटायझेशन, आर्थिक समावेशन आणि गुंतवणूकदारांच...

August 2, 2024 2:26 PM

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज ५० अंकांनी घसरत २४ हजार ७४०वर आला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ रुपये ७३ पैशांवर आला आहे.