September 19, 2024 7:26 PM

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी पातळीला स्पर्श

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आज देशातल्या शेअर बाजारातल्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्सनं आज सकाळच्या सत्रात ८३ हजार ७७४ आणि निफ्टीनं २५ हजार ६१२ या पातळीला स्पर्श केला. पण त्यानंतर दोन्ही शेअर बाजारात घसरण सुरू झाली. दिवसअखेर सेन्सेक्स २३७ अंकांची वाढ नोंदवून ८३ हजार १८५ अंकांवर बंद झाला. निफ्टीनं ३८ अंकांची वाढ नोंदवली आणि हा निर्देशांक २५ हजार ४१६ अंकांवर स्थिरावला. फेडरल रिझर्व्हनं काल ४ वर्षानंतर पहिल्यांच व्याजदरात कपात के...

August 6, 2024 7:15 PM

शेअर बाजारात घसरण सुरुच

जपानच्या निक्केई या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम काल भारतीय शेअर बाजारावर झाला होता. आजही संपूर्ण दिवसभरात शेअर बाजारात घसरण सुरू राहिली.  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज १६६ अंकांची घसरण झाली आणि तो ७८ हजार ५९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६३ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९९३ अंकांवर बंद झाला.

July 19, 2024 2:50 PM

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला आणि ८१ हजार १७७ अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं देखील सुरुवातीच्या सत्रात २४ हजार ८५५ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला, मात्र त्यानंतर तो ७३ अंकांनी कमकुवत होत २४ हजार ७२८ अंकांवर घसरला.

July 16, 2024 2:52 PM

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्समध्ये आज विक्रमी वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात विक्रमी वाढ झाली. सुरवातीला २३० अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ९०० अंकांवर पोचला आणि तिसऱ्या सत्रात निर्देशांक ८० हजार ७३२ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात वाढ बघायला मिळाली. निफ्टीतही सुरवातीला ७४ अंकांची वाढ झाली आणि तो २४ हजार ६१६ वर पोचला.  

June 27, 2024 1:17 PM

शेअर बाजारात दिवसाच्या सुरवातीलाच उत्साह, सेन्सेक्स प्रथमच ७९ हजाराच्या पार

भारतीय शेअर बाजारांमधे आज दिवसाच्या सुरुवातीलाच तेजीचं वातावरण दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी २३ हजार ८८१ अंकांच्या पुढे गेला. सुरुवातीला नफावसुलीमुळे शेअर बाजारात काही काळ निरुत्साह दिसत होता, पण त्यानंतर पुन्हा खरेदीला जोर आल्यामुळे शेअर बाजार विक्रमी अंकांवर पोहोचले.