August 23, 2024 7:37 PM

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचा त्यात समावेश आहे. या निर्देशांमध्ये प्रतिबंधात्मक तरतुदी, विविध संबधित घटकांची जबाबदारी निश्चिती, प्रक्रिया अहवाल, संबधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन याबरोबरच सुरक्षित वातावरण याचे मापदंड यावर भर दिला आहे.

August 22, 2024 3:32 PM

राज्यात येत्या महिन्याभरात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक

महाराष्ट्रात बदलापूर, आणि घाटकोपर मध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील. कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतर पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले...

August 3, 2024 7:31 PM

राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार

विद्यार्थ्यांना राज्य घटनेचं महत्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येत्या १५ ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संविधानातून सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळते. विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणाऱ्या या मंदिरांमध्ये भ...