August 9, 2024 8:07 PM
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित
संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं. गेल्या महिन्यात २२ तारखेला सुरु झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं. लोकसभेत या अधिवेशन काळात १५ बैठका झाल्या, ११५ तास कामकाज झालं, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर २७ तास १९ मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन १२ विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी वित्त विधेयक, विनियोजन ...