September 10, 2024 3:15 PM

सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली

राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून या गावांचा विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल. कोकणात गणेशोत्सवाचं भजन संस्कृतीशी अतूट नातं आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने भजन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. यंदाही अनेक भजनी मंडळांना भजन साहित्याचं वाटप झालं.   तर, ठाणे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी विहंग गार्डन गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ...

August 29, 2024 3:42 PM

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘नव्या भारताचे नवीन कायदे’ विषयावर चित्र प्रदर्शनाचं आयोजन

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस यांच्यातर्फे नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी भाषेत कायद्यांविषयी माहिती दिली असून तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या असल्याचं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं.

July 31, 2024 3:29 PM

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.