September 13, 2024 1:28 PM

पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत – रशिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन

युक्रेनला लांबवर हल्ला करणारी शस्त्रास्त्रं पुरवून पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन रशियाला पुढचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असं पुतीन रशियन स्टेट टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. यूक्रेन रशियावर हल्ला करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रास्त्रांची मागणी करत असल्याची वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यूक्रेनमधल्या युद्धात अमेरिका आणि यु...

September 13, 2024 9:35 AM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

रशियातील सेंट पिटर्स बर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादी मीर पुतीन यांची भेट घेतली. याबाबत रशियाच्या भारतातील दूतावसाने एक निवेदन प्रसिद्ध केल असून त्याबाबत माहिती दिली आहे. या भेटीत पुतीन यांनी भारत आणि रशिया दरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारीची प्रशंसा केली आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या मुद्द्यावर जास्त भर देण्याची इच्छा व्यक्त केली. ...