September 13, 2024 2:32 PM

किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ

देशाच्या किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असलेला हा दर ऑगस्टमधे तीन पूर्णांक ६५ शतांश  टक्के झाला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली.  गेल्या पाच वर्षातला हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात कमी दर आहे. हा दर रिझर्व बँकेच्या २ ते ६ या नियंत्रण कक्षेत आहे.

August 12, 2024 7:52 PM

गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली

या वर्षीच्या जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली आला. गेल्या ५९ महिन्यांतला हा सर्वात कमी दर आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, भाजीपाला, फळं आणि मसाल्यांचे दर घसरल्यामुळं गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात घसरण झाली.