September 9, 2024 7:04 PM

मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर

दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं तिथल्या १०१ नागरिकांना निवारागृहात हलवलं आहे. धुळेपल्ली गावाजवळील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं. पुरामुळे भामरागड-आलापल्ली, आष्टी-मुलचेरा आणि आलापल्ली-सिरोंचा हे तीन प्रमुख मार्ग बंद आहेत.

August 23, 2024 7:18 PM

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला असून नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्...

July 20, 2024 2:49 PM

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.