September 26, 2024 7:02 PM

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ४०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या वाटद, राजापूर, मंडणगड इथं एमआयडीसीसह आणखीही  काही प्रकल्प उभारले जाणार आहेत.

August 31, 2024 7:40 PM

रत्नागिरीत सायन्स गॅलरीचं लोकार्पण

रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीच लोकार्पण आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्याचप्रमाणे त्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं, या दृष्टीनं या गॅलरीची उभारणी करण्यात आली असून यात विविध मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.

August 23, 2024 7:25 PM

रत्नागिरीतल्या ३११ गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबद्द्लची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश आहे. या अहवालानुसार चिपळूणमधल्या ४४, खेडमधल्या ८५, खेडमधल्या २५, लांजा तालुक्यातल्या ५०, राजापूरमधल्या ५१ आणि संगमेश्वर तालुक्यातल्या ८१ गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येत आहेत. स्थानिक नागरिकांनी आपल्या हरकती ६० दिवसांमध्ये मंत्रालयाकडे कळवाव्यात असं मंत्रालयाकडून कळवण्यात आलं आहे.

August 19, 2024 10:10 AM

संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यात काल रत्नागिरीमध्ये सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून, त्यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असं सामंत यांनी ...

July 25, 2024 7:43 PM

‘रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी’

रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी ते बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी आज रत्नागिरीत विविध आढावा बैठका घेतल्या.

July 20, 2024 2:49 PM

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

June 17, 2024 3:48 PM

परशुराम घाटात दरडप्रवण क्षेत्राची पहाणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणजवळच्या परशुराम घाटात दरडप्रवण क्षेत्राची पहाणी केली. जिल्हा पोलिस अधिक्षक तसंच संबधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खेडच्या तहसीलदार कार्यालयात तालुक्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.