August 2, 2024 8:11 PM

राष्ट्रपती भवनात देशभरातल्या सर्व राज्यपालांची दोन दिवसीय परिषद

लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून, घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.   या परिषदेत केंद्र-राज्य संबंधांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. &nbs...