August 20, 2024 3:51 PM
माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र सद्भावना दिवसाचे कार्यक्रम
देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज ८० वी जयंती असून हा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही समाजमाध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. राजभवनातील अधिकारी, कर्मचारी, मुंबई पोलिस दलाचे अधिकारी आणि जवानांना तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्य...