June 26, 2024 1:40 PM
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशेपन्नासाव्या जयंती दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना समाजमाध्यमांवर आदरांजली वाहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्...