August 22, 2024 6:04 PM

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पावसाचा अंदाज

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्ट पर्यंत,  तर  आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढले ५ दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

August 20, 2024 7:53 PM

त्रिपुरा : भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमधे ७ जणांचा मृत्यू

त्रिपुरामधे मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलन  आणि महापुराच्या घटनांमधे किमान सात नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. संततधार पावसामुळं तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला  अतिसखल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं या नद्यांकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे.  आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी त्रिपुरा राज्य सरकारनं राज्यभरात १८३ निवारा छावण्या उभारल्या असून तिथली जिल्हा प्रशासनं पुरग्रस्त नागरिकांना अहोरात्र म...

August 19, 2024 11:14 AM

पश्चिमबंगाल, ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, छत्तीसगड आणि दक्षिण द्वीपकल्प परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

August 18, 2024 1:17 PM

येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसांत देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  बांगलादेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र उत्तर तसंच वायव्य दिशेला जाण्याची शक्यता असून त्यामुळे पश्चिम बंगालच्या  गांगे भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल. यामुळे ओदिसा, झारखंड, बिहार, सिक्किम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरात मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच केरळ, तामिळना...

August 17, 2024 3:56 PM

मराठवााड्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

मराठवााड्यात काल अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.   बीड जिल्ह्यातल्या पाटोदा महसूल मंडळात काल मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस पडत असून मांजरा नदीला महापूर आला आहे. पाटोदा, पारगाव, अनपटवाडी या नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून शेकडो एकर जमिनीवरची पिकं पाण्याखाली गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   हिंगोली जिल्ह्यातल्या तीसपैकी नऊ मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली असून, काल पहाटे मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळं हिंगोली शहरालगत असलेल्या कया...

August 15, 2024 6:35 PM

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज आहे.

August 12, 2024 3:16 PM

राज्यात पावसाची विश्रांती

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द, आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा...

August 7, 2024 7:45 PM

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं.   गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुद्धा सध्या पाऊस थांबला आहे. पावसामुळे धरणातला पाणीसाठा वाढला असून गंगापूर, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी आणि केळझर या धरणामध्ये अद्य...

August 2, 2024 5:52 PM

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

वाशिम जिल्ह्यात पावसानं  सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरावं अशा सूचना पालिकेनं दिल्या आहेत.

August 2, 2024 7:31 PM

जोरदार पावसामुळे नंद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणच्या नद्या आणि तलाव भरून वाहत आहेत.   सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या ५ हजारहून अधिक जणांना पशुधनासह सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सांगलीत आयर्विन पुल आणि मिरज या दोन्ही ठिकाणी कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं प्रशासनानं आवाहन केल आहे.   गोंदिया जिल्ह्...