September 22, 2024 2:09 PM

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मराठवाडा इथं पुढचे दोन दिवस तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा इथं मंगळवार ते शुक्रवार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, छत्तीसगड इथं पुढचे चार दिवस तर नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं पुढील सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

September 22, 2024 1:57 PM

बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुल्तानगंज आणि रतनपूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. गंगा आणि अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पटणा, वैशाली आणि बेगूसराय यांसह १२ जिल्ह्यांत पूर आला आहे. याचा फटका १० लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल पटणा आणि वैशाली य...