September 12, 2024 3:17 PM

रायगड जिल्ह्यात रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये आज सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहाेचला. यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं. घटनास्थळी अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

July 30, 2024 3:34 PM

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०० घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ३ हजार ३८९ जणांना स्थलांतरित केलं असून शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.   कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.   सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे. &...

July 19, 2024 5:14 PM

रायगड : कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदार हिचा रील्स करताना पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला; या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.   पोलीस प्रशासनानं धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात जीव धोक्यात घालणारी हुल्लडबाजी (स्टंटबाजी) करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.

July 17, 2024 3:21 PM

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या रुपये ४३२ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत २८ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४१ कोटी ६१ लक्ष अशा एकूण ५०१ कोटी ६१ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

June 14, 2024 11:53 AM

पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.