June 25, 2024 10:00 AM

पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

  महाराष्ट्रात पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याचे आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरध्वनी करुन मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आ...

June 17, 2024 10:23 AM

पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या निर्णयात चुका असल्याचा चौकशी समितीचा अहवाल

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना, बाल न्याय मंडळानं अनेक चुका केल्या असल्याचा ठपका पाच सदस्यांच्या समितीनं ठेवला आहे. मंडळाच्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीनं तयार केलेल्या १०० पानी अहवालात बाल न्याय मंडळाद्वारे अनेक चुका झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.