July 14, 2024 7:25 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रंप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यातल्या मृतांचे कुटुंबीय, जखमी व्यक्ती आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात भारत सहभागी आहे, असंही त्यांनी सांगितलं.    अमेर...

July 14, 2024 12:19 PM

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे – प्रधानमंत्री

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंतप्रधानांनी सांगितलं.   ‘विकसीत भारत’च्या आगामी २५ वर्षांच्या प्रवासात वर्तमानपत्रं आणि मासिकांची महत्वाची भूमिका असल्याचं नमूद करत लोकांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत असल्याबद्दल त्यांनी प्र...

June 29, 2024 3:42 PM

पंतप्रधान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.  

June 19, 2024 8:51 PM

देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.    शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक...

June 14, 2024 3:19 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोनासनावरील चित्रफीत समाज माध्यमावर केली प्रसारित

येत्या २१ जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोणासन करतानाचा व्हिडियो समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. आरोग्यासाठी हे आसन कसं करावं याची माहिती त्यात प्रधानमंत्र्यां दिली आहे. खांदे, पाठ यांची कार्यप्रवणता सुधारण्यासाठी आणि एकाग्रता वाढीसाठी हे आसन करावं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे.