September 9, 2024 6:17 PM

श्रीलंका राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चर्चेसाठी बोलावले

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीचे आर्थिक व्यवहाराचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वासंबंधी चर्चा करण्यात आली. निवडणुकीत होणारा सार्वजनिक संसाधनाचा वापर तसंच काही माध्यम संस्थांच्या निवडणुकीतल्या गैरवर्तनाबद्दल काही उमेदवारांनी या बैठकीत चिंता व्यक्त केली.  दरम्यान, या बैठकीनंतर निवडणूक निरीक्षकांसोबतही बैठक घेण्यात आली.   निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यावर भर दिला आहे, ...

August 15, 2024 8:09 PM

श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुुकीत ३९ उमेदवार रिंगणात

श्रीलंकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहे. २१ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि मार्क्सवादी नेते अनुरा दिस्सानायके यात प्रमुख उमेदवार आहेत.

July 29, 2024 8:38 PM

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी झाल्याची घोषणा राष्ट्रीय निवडणूक परिषदेने केली आहे. मादुरो सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. ८० टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली असून मादुरो यांना ५१ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक परिषदेचे एल्विस अमोरोसो यांनी सांगितलं. एकूण मतदारांपैकी २१ दशलक्ष मतदारांनी निकोलस मादुरो यांना आपली पसंती दर्शवली आहे. दरम्यान, हा निकाल फसवा असून याला कायदेशीर आव्हान देणार असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

July 18, 2024 3:27 PM

कोरोना बाधित जो बायडन यांनी अध्यपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या मागणीला जोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-1९ चा संसर्ग झाल्यानंतर,अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते, तसंच कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी,अध्यक्ष बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचं जाहीर आवाहन केलं आहे.   बायडन यांनी आपल्या वयाशी निगडित आरोग्य आणि स्वास्थ्याचा विचार करून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही, तर देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी ते हितकारक ठरेल, असं मत अमेरिकी संसदेच्या बहुसंख्य नेत्...