July 20, 2024 12:18 PM

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 94 विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 31 जणांना परम विशिष्ट सेवा पदकं, 4 जणांना उत्तम युद्ध सेवा पदकं, 57 जणांना अति विशिष्ट सेवा पदकं तर दोघांना पुन्हा एकदा अतिविशिष्ट सेवा पदकं बहाल करण्यात आली. या समारंभाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि ...

July 18, 2024 8:13 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांवर “विंग्ज टू अवर होप्स – खंड एक” पुस्तकाचं प्रकाशन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांचं संकलन असलेल्या  "विंग्ज टू अवर होप्स - खंड एक" या पुस्तकाचं आज राष्ट्रपती भवनात प्रकाशन करण्यात आलं.  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत पुस्तकाच्या ई-आवृत्तीसह इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीचं प्रकाशन केलं.  "कहानी राष्ट्रपती भवन की" आणि "राष्ट्रपती भवन-हेरिटेज मीट्स द प्रेझेंट" या दोन पुस्तकांचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं.

July 6, 2024 9:56 AM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पदकांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्रांचा समावेश आहे. यापैकी 7 जवानांना मरणोत्तर कीर्ती चक्र आणि 7 जवानांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आली. अतुलनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि कर्तव्याप्रती निष्ठा दाखविणाऱ्या जवानांना हे पुरस्कार देण्यात आले. ...

June 21, 2024 9:51 AM

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची नियुक्ती

भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यन्त, महताब अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असं रिजिजू यांनी संदेशात म्हंटलं आहे.   सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडीकुन्नील, टी बालु, राधा मोहन सिंग,...