September 20, 2024 12:46 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज रांची मधल्या नामकुम इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते.