August 7, 2024 8:27 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विनेश फोगाट यांच्या कामगिरीचं कौतुक

विनेश फोगाटनं आत्तापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. देशाला तिचा अभिमान असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं. तिला अपात्र ठरवल्यामुळे संपूर्ण देश निराश आहे, पण तरीही सर्व देशवासीयांसाठी ती चॅम्पियन असल्याचं मूर्मू यांनी नमूद केलं.   विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीही निराशा व्यक्त केली. यामुळे कोट्यवधी भारतीयांना धक्का बसल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये नमूद केलं.

August 7, 2024 8:12 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून उद्या त्या राजधानी वेलिंग्टनला भेट देतील. होंगी परंपरा, माओरी स्वागत समारंभ आणि हाका सादरीकरण अशी न्यूझीलंडची समृद्ध परंपरा त्या अनुभवणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू गव्हर्नर जनरल किरो, प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन आदी महत्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल एडुकेशन परिषदेला संबोधित करणार आहेत.

August 2, 2024 8:10 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ ते १० ऑगस्टदरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या तीन देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ ते १० ऑगस्टदरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फिजी आणि टिमोर लेस्ट या दोन देशांना भारताच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभाग सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पूर्वेकडे पहा या धोरणामुळे नैऋत्य भारत आणि प्रशांत क्षेत्राकडे भारताचं विशेष लक्ष असल्याचं आणि हे तिन्ही देश या धोरणांतर्गत येत असल्याचं त्यांनी सांगितल...

July 30, 2024 8:37 PM

येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांच्या राज्यपालांची परिषद

देशातल्या सर्व राज्यांच्या राज्यपालांची परिषद येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नुकतेच लागू झालेल्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र तसंच आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यातल्या विकासकामांमधे राज्यपालांची भूमिका या विषयाच्या अनुषंगाने या परिषदेत चर्चा होईल.

July 26, 2024 8:28 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा पुढे ढकलण्यात आला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या २९ तारखेचा मुंबई दौरा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या २९ तारखेला वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन, तसंच महाराष्ट्र विधीमंडळातल्या सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार दिले जाणार होते. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलल्यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलला असल्याचं महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं कळवलं आहे.

July 7, 2024 8:38 PM

ओदिशात जगन्नाथ रथयात्रेला सुरूवात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही उपस्थिती

ओडिशात,भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आज संध्याकाळी पुरी शहरात सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ रथ ज्या रस्त्यावरून ओढला जाणार आहे तिथं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सामील सहभागी झाल्या आहेत. या रथयात्रेसाठी जगभरातले भाविक आले आहेत.    त्याआधी पहंडी विधी झाल्यानंतर पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा या तिन्ही भावंड देवतांचं पूज...

June 29, 2024 9:39 AM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू

राज्यसभेत विरोधकांनी नीट परीक्षा गैरप्रकार प्रकरणी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. या चर्चेसाठी 21 तास राखून ठेवण्यात आले आहेत. कालच्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पार्टीनं कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असतो, तेव्हा तेव्हा राज्यघटना धोक्यात असते असा आरोप करण्यात आला. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बदलांसह अनेक उदाहरणं देण्यात आली.   दरम्यान, लोकसभेत विरोधक नीट मुद्द्यावर चर...

June 20, 2024 8:21 PM

देशाचा विकास दिव्यांगांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो – राष्ट्रपती

एखाद्या देशाचा किंवा समाजाचा विकास त्या देशाच्या नागरिकांनी दिव्यांग जनांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो, असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं मांडलं. त्या पंडित दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. समावेशी वृत्ती हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचं मुर्मू यावेळी म्हणाल्या.   मुर्मू यांनी या संस्थेतल्या दिव्यांग मुलांशी संवाद साधला. त्यांनी या संस्थेतल्या नविकृत कृत्रिम अवयव केंद्रालाही भेट दिली. ...