September 1, 2024 6:46 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापनेपासून गेल्या ७५ वर्षांमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेचा पहारेकरी म्हणून अमूल्य योगदान दिलं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय न्यायशास्त्राचं स्थान उंचीवर नेऊन ठेवल्याचं सांगून यात योगदान देणाऱ्या सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रप...

August 31, 2024 2:20 PM

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची भाजपाच्या आमदारांची मागणी

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निष्प्रभ आहे, असा आरोप करत दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिलं. दिल्ली प्रशासनाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यामुळे लोकहिताच्या कामांवर परिणाम होत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.

August 28, 2024 6:51 PM

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं उद्घाटन येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. उदगीरमधे तळवेस इथं बुध्द विहाराचं बांधकाम केलं आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी इथल्या बुध्द विहाराची ही प्रतिकृती आहे. उद्घाटन समारंभाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

August 28, 2024 6:38 PM

कोलकात्यात डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना पूर्ण देशासाठी भीषण धक्कादायक – राष्ट्रपती

कोलकात्यात डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना पूर्ण देशासाठी भीषण धक्कादायक असून आता जनता हे सहन करणार नाही असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारचे गुन्हे सर्रास घडतात हे अधिक भयावह असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पूर्वप्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलीही यातून सुटलेल्या नाहीत. कोणताही समाज आपल्या लेकींना भयमुक्त वातावरण देऊ लागतो असं मत मुर्मू यांनी व्यक्त केलं आहे.

August 22, 2024 9:38 AM

तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तंत्रज्ञानाचा गैरवापर विनाशकारी ठरू शकतो म्हणून तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा,असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल हरियाणातल्या फरीदाबाद इथं जे सी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होत्या.प्रगतीचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध झाले असून तंत्रज्ञानाच्या विकासामुळं आणि दुर्गम भागात इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं ऑनलाइन रोजगारांची संख्या निर्माण झाली आहे.असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.या विद्यापीठानं अनेक औ...

August 15, 2024 8:00 PM

पारशी नववर्ष नवरोजनिमित्त राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

देशभरात आज नवरोज उत्साहात साजरा केला जात आहे. पारशी बांधवानी अग्यारीत जाऊन या निमित्त प्रार्थना केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पारशी नववर्ष, नवरोजनिमित्त सर्व नागरिकांना, विशेषत: पारशी समाजातल्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हे आनंद, उत्साह आणि विश्वासाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पारशी समाजानं आपल्या परिश्रमातून देशाच्या विकासात मोठं योगदान दिले आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं,   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य...

August 14, 2024 8:12 PM

देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या प्रगतीचा आढावा

राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यासंदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दि...

August 13, 2024 8:18 PM

राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान २०२४चं उद्या उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती भवनात वार्षिक उन्हाळी अमृत उद्यान २०२४चं उद्घाटन करणार आहेत. हे ​​उद्यान १५ सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे. उद्यानातल्या काही प्रमुख आकर्षणांत बोन्साय गार्डन, सेंट्रल लॉनमधील दुर्मिळ आणि विदेशी फुलांचे लँडस्केप, लांबलचक रोझ गार्डन, भव्य वटवृक्ष, ट्री हाऊससह बाल वाटिका आणि परस्परसंवादी साउंड पाईप प्रदर्शन यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी अमृत उद्यानात खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे. अभ्यागतांच्या सुविधेसाठी क...

August 10, 2024 8:31 PM

भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही संवाद साधला.

August 8, 2024 8:18 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आज सकाळी वेलिंग्टन इथं पोहोचल्या. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या उपस्थितीत त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेलिंग्टन रेल्वे स्थानका समोरच्या उद्यानातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.   राष्ट्रपती मुर्मू यांनी आज वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सीमाशु...