September 10, 2024 12:55 PM

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं आवाहन

मृत्यूनंतर केलेलं अवयवदान हे अनेकांसाठी जीवदान ठरू शकतं, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या अवयवदान जनजागृती सोहळ्यात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यातल्या १६ हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा एक विक्रम असल्याचं जाधव म्हणाले. या सोहळ्यात उपस्थितांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली. तसंच अवयवदानाचा संकल्प घेतलेल्यांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मा...

September 6, 2024 1:21 PM

आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आता नॅशनल एक्झिट टेस्ट अनिवार्य

आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखांमध्ये 2021-22 पासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात एन ई एक्स टी देणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल केली. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमध्यमांशी बोलताना सांगितलं. एक वर्षांची आंतरवासिता अर्थात इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर परव...

August 31, 2024 8:07 PM

येत्या पाच वर्षांत १० आयुष संस्था उभारण्यात येणार – आयुषमंत्री प्रतापराव जाधव

प्रत्येक घराघरांत आयुर्वेद पोहोचवण्याची प्रधानमंत्र्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आयुष मंत्रालय कटिबद्ध असून येत्या पाच वर्षांत १० आयुष संस्था उभारण्यात येणार असल्याचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद इथं झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.