August 16, 2024 8:15 PM

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात सामंजस्य करार

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आणि संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यावेळी उपस्थित होते. संसाधनांची देवाण-घेवाण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.    कार्यक्रमांची देवाण-घेवाण, प्रसारभारतीच्या ओटीटी मंचांवर संसद टीव्हीचं प्रसारण तसंच प्रशिक्षण सुविधांचा उपयोग करणं, हा या कराराचा उद्देश असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं.

August 10, 2024 3:55 PM

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राला दिली भेट

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. श्रोत्यांना आवडण्याजोग्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केली. युवा आणि महिला केंद्रित कार्यक्रमांवर अधिक भर घ्यावा, आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने अधिकाधिक कार्यक्रम जाहिरातदारांपर्यंत घेऊन जावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. वृत्तविभागाच्या प्रमुख सरस्वती कुवळेकर, कार्यक्रम प्रमु...