June 26, 2024 5:40 PM

सभापतीपदासाठी उमेदवार दिल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर टीका

लोकसभेच्या सभापतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज टीका केली. ते संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते. उपसभापतीपदासाठी सरकार चर्चेला तयार आहे मात्र त्यासाठी पूर्व अटी घालणं योग्य नाही असंही ते म्हणाले. ]लोकसभा सभापतीपदासाठी विरोधी पक्षांनी दबावाचं राजकारण केल्याची टीका केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी केली. सरकारनं या मुद्द्यावर कोणतीही चर्चा केली नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.

June 25, 2024 3:17 PM

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला – मंत्री प्रल्हाद जोशी

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते.  ऊसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना केलं.