June 24, 2024 1:36 PM

संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाने १८ व्या लोकसभेचे पहिलं अधिवेशन सुरू होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठा सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. आपल्या सरकारला सर्वांना सोबत घेऊनआणि संविधानाचे पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचं लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सोहळा नवीन संसद भ...