August 4, 2024 2:53 PM
कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा
नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या सहा दिवसीय परिषदेला ७५ देशांमधले कृषी अर्थतज्ञ उपस्थित असून त्यांनी भारताच्या कृषिक्षेत्रातल्या कामगिरीचं आणि संशोधनाचं कौतुक केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. भारत अनेक कृषी उत्पादनांमधला अग्रणी उत्पादक आहे, भारताची वैविध्यपूर्ण जैवसंस्था आणि कृषी शिक्षणासाठ...