August 22, 2024 8:05 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात, दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागिदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय
भारत आणि पोलंडनं परस्परांबरोबरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वॉर्सा इथं पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे निवेदन जारी केलं. दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांचं यंदा ७० वं वर्ष असून, भारत-पोलंड संबंध लोकशाही आणि कायद्याचं राज्य यासारख्या सामायिक मूल्यांवर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्य...