August 30, 2024 8:18 PM

आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शहर आणि गावातली दरी दूर करुन आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञान विषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला  संबोधित करत होते. गेल्या १० वर्षांत ३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक फिनटेकमध्ये झाली असून फिनटेक स्टार्टअप्समध्ये ५०० टक्के वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. बँक व्यवहारांचं संगणकीकरण झालं, गेल्या १० वर्षात ५३ कोटी  जनधन खाती उघडली गेली त्यात २९ कोटींपेक्षा जास्त खाती महिलांची आहेत, असं सांगून ते म...

August 26, 2024 1:28 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांच्याशी संवाद साधला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध आणि सहकार्य, तसंच क्वाडबद्दल यावेळी चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली आहे.

August 25, 2024 8:33 PM

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी – प्रधानमंत्री

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जयपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.    न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून अनेक कालबाह्य कायदे सरकारनं रद्द केले आहेत. नुकतेच नवे फौजदारी कायदे लागू केल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशातल्या १८ हजार न्यायालयात ई- कोर्ट प्रणाली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. याव...

August 25, 2024 3:24 PM

देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री

देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव मध्ये आज झालेल्या लखपती दिदी संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातल्या ११ लाख नव्या लखपती दीदींना, प्रतिकात्मक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला गेला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत १ कोटी लखपती दीदी झाल्या आहेत, तर गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी ११ लाख लखपती दीदींची भर पडल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिल...

August 25, 2024 3:23 PM

महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती दिदींशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात जळगाव इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी संवाद साधला. महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं. ३० हजार ठिकाणच्या ११ लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात लखपती दीदी प्रमाणपत्रं देण्यात आली.    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मह...

August 25, 2024 12:57 PM

विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज – प्रधानमंत्री

  देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११३वा भाग होता.    आज  मोठ्य़ा संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. युवा वर्गान या अभ...

August 25, 2024 2:12 PM

लखपती दीदी मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जळगावात आगमन

लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह स्थानिक खासदार- आमदार, तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं.    जळगाव विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजात...

August 24, 2024 1:59 PM

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं स्वागत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे.

August 23, 2024 12:59 PM

प्रधानमंत्र्यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे. अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठीचे प्रयत्न यामुळे हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. रशियानं लष्करी कारवाई थांबवावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं किमान तीन ठरावांमध्ये केली आहे, तर एका ठरावात युक्रेनच...

August 23, 2024 1:46 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११३ वा भाग असेल.