September 4, 2024 8:05 PM

ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री सिंगापूरमधे दाखल

दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरमधे पोहोचले. सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षण्मुगम यांनी त्यांचं स्वागत केलं. सिंगापूरमधल्या भारतीय समुदायानं लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री या दौऱ्यात सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग आणि इतर मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. भारत सिंगापूर धोरणात्मक संबंधांविषयी, तसंच क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल.   प्रधानमंत्र...

September 2, 2024 1:16 PM

प्रधानमंत्री उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.   भारत ब्रुनेई राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत असताना हा दौरा होत असून ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय प्रधानमंत्री आहेत, असं ते म्हणाले. ब्रुनेईचा दौरा झाल्यानंतर प्रधानमंत्री सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांच्या आमंत्रणावरुन ते तिथे जाणार असून या भेटीत अनेक मह...

September 2, 2024 10:50 AM

उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, उपाध्याय यांच्या निधनानं पत्रकारितेच्या जगाचं न भरून येणारं नुकसान झालं असल्याचं समाजमाध्यमांवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.   उपाध्याय 64 वर्षांचे होते. दक्षिण दिल्लीतल्या वसंत कुंज भागात त्यांच्या घराच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहाणी करताना चौथ्या मजल्यावरुन उपाध्याय पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

September 2, 2024 9:34 AM

आंध्र प्रदेश, तेलंगणमधील पूरस्थितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा

  प्रधानमंत्रीं नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिका...

August 31, 2024 7:09 PM

महिला सुरक्षेचे कायदे सक्रिय करण्याची आणि या प्रकरणांचा निकाल लवकर लावण्याची गरज प्रधानमंत्र्यांच्याकडून व्यक्त

देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक कायदे लागू केले आहेत. हे कायदे आणखी सक्रीय करायची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. अशा प्रकरणांचे निकाल जितक्या लवकर लागतील, तितकी आपण सुरक्षित असल्याची खात्री महिलांना पटेल, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांनी आज केलं. त्यानंतर ते बोलत होते.  सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक विशेष टपाल तिकीट आणि एका नाण्याचं प्रकाशनही मो...

August 31, 2024 3:39 PM

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार, आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मीरत-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोईल या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे देशातली महत्त्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील, मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या बेंगळुरूशी जोडलं जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी यावे...

August 31, 2024 10:38 AM

वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमीपूजन, तसंच २१८ मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हे आशियातल सर्वात मोठं आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरांमधलं एक बंदर असेल. वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होतील, मच्छीमार आणि स्थानिकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा होतील.   स्थानिक मच्छीमारांना transponders चं वाटप त्यांनी केलं. हे transponder बोटीवर लावायचे असून याद्वारे संपर...

August 31, 2024 10:26 AM

प्रधानमंत्री आज जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षं झाल्याच्या निमित्ताने एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या या परिषदेत जिल्हास्तरीय न्यायपालिकेसमोरच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी पाच सत्रं होणार आहेत. सरन्यायाधीश, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री आणि ॲटर्नी जनरल या परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ...

August 30, 2024 7:45 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३ सप्टेंबरपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३ सप्टेंबरपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते रणधिर जैसवाल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. ब्रुनेईचे सुलतान हजि हसनल बोलकिआ यांच्या निमंत्रणावरून ते ३ तारखेला  ब्रुनेई दारूसालमला जातील. मोदी हे या देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय प्रधानमंत्री आहेत.  सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या आमंत्रणावरून ते चार सप्टेबरला सिंगापूरला रवाना होतील.

August 30, 2024 7:04 PM

मालवण राजकोटमधला शिवरायांचा पुतळा पडल्याबद्दल प्रधानमंत्र्याकडून दिलगिरी व्यक्त

देशातल्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होईल. इथं येणाऱ्या हजारो जहाजं आणि कंटेनर मुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून जाईल. महाराष्ट्राकडे विकासासाठी लागणारं सामर्थ्य आणि संसाधनं आहेत. महाराष्ट्राला समुद्री व्यापाराचा इतिहास आहे आणि भविष्यातही व्यापाराच्या संधी आहेत, असं ते म्हणाले.  महाराष्ट्राचा, या परिसराचा विकास होऊ नये असं वाटत असल्यानं विरोधक या बंदराला विरोध करत असल्याची टीका मोदी यांनी केली.    मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवा...